हागणदारी मुक्ती अभियान

Saturday, June 20, 2015 - 09:31

डॉ. दत्ता देशकर, पुणे

 

आपले पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी सम्पूर्ण भारत स्वच्छता अभियान छेडले आहे त्यामुळे आज याबद्दल सम्पूर्ण भारतातच नव्हे तर जगात तो चर्चेचा एक विषय बनला आहे। सुरूवातील त्याबद्दल चर्चा सुरू झाली, पण या अभियानाचा देशाच्या विकासाशी प्रत्यक्ष सम्बन्ध आहे याची त्यांनी जाणीव करून दिल्यानंतर मात्र या ही चर्चा थंडावली आणि आता हे अभियान यशस्वी कसे होईल यावर देशात विचारमंथन सुरू झालेले दिसून येत आहे।

 

या स्वच्छता अभियानात सर्वात महत्वाचा भाग हा हागणदारी मुक्तीशी निगडित आहे। आपल्या आजूबाजूचे जे शेजारी आहेत तिथे काय परिस्थिती आहे हे पाहिले तर एक मजेदार बाब लक्षात येते। बांग्ला देश हा जवळपास 100 टक्के हागणदारी मुक्त देश आहे हे वाचून तर मला धक्काच बसला। मी स्वतः ढाक्याला तीनदा जावून आलो आहे। तिथली एकंदर स्वच्छता बघता मला या गोष्टीवर विश्वास बसणे कठीण गेले। आपला दुसरा शेजारी श्रीलंका हा 99 टक्के हागणदारी मुक्त देश आहे। त्या देशात सुध्दा मी गेलो होतो तेव्हा तिथली स्वच्छता व टापटीप नजरेत भरण्यासारखी होती। त्यामुळे या गोष्टीवर मात्र माझा ताबडतोड विश्वास बसला। पाकिस्तानमध्ये अजूनही 28 टक्के जनता या फेन्यातून बाहेर पडलेली नाही। आपल्या देशात मात्र परिस्थिती फारच भयानक आहे। अजूनही 54 टक्के लोक सर्रास मुक्त हागणदारीचा लाभ घेत आहेत। थोडक्यात हागणदारी मुक्तीपेक्षा मुक्त हागणदारीच आपल्याला अधिक प्रिय असलेली दिसते। बांग्लादेश व श्रीलंका यांच्यापासून आपल्याला ही निश्चितच शिकण्यासारखी बाब आहे।

 

केन्द्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे सम्पूर्ण स्वच्छता अभियान रबाविले जात होते। या अभियानाचे मूल्यांकन करण्याचे काम माझे विद्यार्थी मित्र श्री. कृष्णराव देशपांडे यांच्या मैत्री या संस्थेला मिळाते। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा यात अभ्यास करावयाचा होत। या सम्बन्धात अहवाल लिहिण्याचे काम त्यांनी माझ्यावर सोपविले होते। जो पर्यंत मी स्वतः हे काम बघणार नाही तोपर्यंत व वास्तव स्वरूपात होणार नाही असे मी त्यांनी म्हणताच मी त्यांच्याबरोबर या सर्व जिल्ह्यांना भेटी द्याव्यात असे ते म्हणाले। त्यामुळे या सर्व जिल्ह्यांचा बारकाईन अभ्यास करण्याची संधी मला मिळाली। अभ्यास करतांना माइया लक्षात ज्या त्रुटी आल्यात त्यांचा या संदर्भात कोणतेही नवीन योजना आखतांना विचार व्हावा या दृष्टीने या लेखाचे प्रयोजन आहे। प्रमुख त्रुटी येणेप्रमाणेः

 

1. सम्पूर्ण स्वच्छता अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीला जो निधी देण्यात आला होता त्यापैकी 15 टक्के निधा हा माहिती, शिक्षण व संवाद यासाठी खर्च केला जावा अशी तरतूद होती। हागणदारी मुक्तीचा प्रसार व्हावा, सामान्य माणसापर्यंत ही कल्पना पोहोचावी यासाठी हा खर्च अपेक्षित होता। दुर्दैव असे की हा सर्व होवून बसला पण प्रत्यक्षात या संदर्भात फारच कमी काम झालेले आढळले। लाखो प्रचार पत्रिका छापल्याचे बिल आढळले पण प्रत्यक्षात जेव्हा ग्रामस्थांजवळ चौकशी केली तेव्हा अशी कोणतीही प्रचार पत्रिका मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले। याचा थोडक्यात अर्थ असा की खोटी बिले तयार करून पैसा उचलला गेला पण प्रत्याक्षात मात्र हे काम झालेलेच नाही। सर्वच सरकारच्या योजनांतील हीच प्राथमिक अडचण जाणवते। मला या योजनेतून किती पैसे खाता येतील याचा नवीन योजना हालाळतांना प्रत्येकच ठिकाणी विचार होतांना आढळतो।

 

2. प्रत्येक घरात शौचालय बाँधले जावे म्हणून सरकारकडून प्रत्येक लाभार्थ्याला ठराविक प्रमाणात अनुदान देण्याची तरतूद या योजनेत होती। ती रक्कम एवढी तोकडी होती की त्यात काहीही काम पूर्ण होवू शकत नव्हते। आपण शौचालये बाँधली नाहीत तर भविष्यात अनुदान आणखी वाढेल असे बन्याच ग्रामस्थांना वाटत होते। त्यामुळे नंतर बघू अशी बन्याच ग्रामस्थांची भावना होती।

 

3. मुक्त हागणदारी रक्तात भिनली असल्यामुळे बन्याच ठिकाणी शौचालये बाँधली गेल्यावर सुध्दा त्यांचा वापर न करण्याकडे प्रवृत्ती आढळून आली। कित्येकांनी तर घरात एक खोली वाढली असे समजून नवीन बाँधलेल्या शौचालयाचा वापर एक जास्तीची खोली म्हणून केलेला आढळला। बहुतांश ठिकाणी वाळलेले जळतण साठविण्यासाठी चांगली सोय झाली असे समजून या शौचलयाचा वापर जळतण साठविण्याची खोली म्हणून केला।

 

4. बन्याच ठिकाणी ग्रामस्थ व सरकारी यंत्रणा यांच्यात मांडवली होवून पैशाची देवाण घेवाण झाली पण प्रत्यक्षात संडास बाँधण्यातच आला नाही। प्रत्यक्षात संडास बाँधला गेला की नाही हे तपासणार कोण हो? तेच सरकारी अधिकारी, मग प्रश्नच मिटला। असा एखादा सर्व्हे केला जाईल याची कल्पना नसल्यामुळे सर्वच बिनधास्त व्यवहार होता। ही सर्व परिस्थिती पाहिल्यावर विहीर चोरी गेलेल्या सिनेमाची आठवण झाली व सरकारी यंत्रणा किती मोठया प्रमाणावर पोखरली गेली आहे याची जाणीव झाली।

 

5. घरात संडास बाँधण्यात सर्वात महत्वाची अडचण म्हणजे पाण्याची उपलब्धता। घरात संडास बाँधायचे म्हणजे तो फ्लश करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा। चार ते पाच किलोमीटर वरून पाणी आणायचे ते काय या कामासाठी वापरायचे? आणलेल्या पाण्यात सर्व प्रथम पिण्यासाठी व स्वयंपाकासाठी पाणी राखून ठेवायचे, पाणी भरण्यात कोणतेही कष्ट न करणारा नवरा सर्वप्रथम आंघोळ करणार, मुलांच्या आंघोळी व कपडे, भांडी धुण्यासाठी पाणी वापरल्यावर पाणी भरणान्या महिलेच्या आंघोळीसाठीच पाणी शिल्लक राहात नाही। अशा परिस्थितीत संडास साफ ठेवण्यासाठी पाणी वापरण्याची चैन कोणाला परवडणार?

 

6. घरात शौचालय बाँधण्यासाठी एका मानसिकतेची आवश्यकता असते। मा एका कलेक्टरच्या घरी भाडयाने राहात होतो। मी जेव्हा घर बघण्याच्या दृष्टीने त्यांच्या घरी गेलो तेव्हा मला संडास घरापासून बराच दूर बाँधलेला दिसला। मी त्यांना याचे कारण विचारले, आम्ही काय भिकारी आहोत काय घरात संडास बाँधण्यासाठी असे त्यांचे उत्तर होते। ही जर एका शिक्षित  माणसाची प्रतिक्रिया असेल तर ग्रामीण भागात राहणान्या अशिक्षित माणसाबद्दल काय बोलावे?  संडासाचा व घराचा दूरान्वयेसुध्दा सम्बन्ध नसावा, प्रातर्विधी साठी दूर कोठे तरी जावे अशी पिढयांपिढया लागलेली सवय तात्काळ कशी जाणार हाही महत्वाचा प्रश्नच आहे।

 

घरात संडास नसण्याचे परिणामः

 

1. मुक्त हागणदारीचा सर्वात महत्वाचा परिणाम सार्वजनिक आरोग्यावर होतो। माणसाच्या विष्ठेत असलेले जीवजंतु मुक्त हागणदारीमुळे सर्वत्र पसरतात। माश्या या जंतुंना घरात घेवून येतात। त्या अत्रावर बसतात व तिथून विकरांची सुरूवात होते। हागवण, कॉलरा, कावीळ, यासारखे विकार त्यामुळे बळावतात। जगात सर्वत्र पोलियो निर्मूलन बन्याच वर्षापूर्वी झाले असतांना भारतात मात्र हे निर्मूलन होण्यासाठी 2014 साल उजाडावे लागले याचे प्रमुख कारण म्हणजे मुक्त हागणदारी हे होय। आजही हा विकार भारतात परतणार तर नाही ना ही भिती सर्वत्र व्यक्त होतांना दिसते याचे प्रमुख कारण अजूनही आपण भारत हागणदारी पासून मुक्त करू शकलेलो नाही हेच होय।

 

2. या मुक्त हागणदारीचा सर्वात विपरित परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो। ग्रामीण भागात पहाट होण्याचे आधी किंवा अंधार पडल्यानंतरच त्यांना मलविसर्जनासाठी घराबाहेर पडावे लागते। दिवसभर त्यावर नियंत्रण ठेवावे लागते। त्यामुळे त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम झाल्याशिवाय राहात नाही। शाळेत शौचालयाची सोय नसल्याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर होतो। त्यांचे शिक्षणच त्यीमुळे बन्द पडते।

 

3. खेडयात राहणान्या महिलांना आणखी एका संकटाला तोंड द्यावे लागते। रात्रीच्या वेळी मल विसर्जनासाठी बाहेर पडणान्या महिलांवर समाज कंटकांचे लक्ष रहाते व ते या संधीचा फायदा घेवून त्यांची छेडछाड करतात। वेळप्रसंगी त्यांना बलात्कारासारख्या हिडिस प्रसंगांना तोंडही द्यावे लागते। घरातील कुटुम्ब प्रमुखाकडे लाजेकाजेस्तव या बाबत तक्रारही येत नाही। केलीच तर गावात खूनखराबा झाल्याशिवाय राहात नाही। शेवटी तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो।

 

4. आज ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे। शिकलेल्या मुलींना या प्रकाराची लाज वाटते। त्या जास्तीत जास्त आपल्या आईकडे तक्रार करू शकतात। पण या सम्बन्धात वडिलांशी बोलण्याची त्यांची हिंमत होत नाही। परिणामी हे दुःख त्यांना निमूटपणे भोगावे लागते।

 

मोदीसाहेबांची योजना हाथ आशेचा एक किरणः

 

आपले पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांनी या सम्बन्धात उचललेले पाऊल हे निश्चितच प्रगतीच्या दृष्टीने उपकारक ठरणार आहे। त्यांनी देशातील मोठया उद्योगपतींना केलेले आवाहन अत्यंत बोलके आहे। कंपनीज सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या योजने अंतर्गत उद्योग जगताने शौचालय उभारणीत पुढाकार घ्यावा अशी विनंती त्यांनी देशातील उद्योजकांना केली आहे। बन्याच उद्योजकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाहदी दिला आहे। प्रत्येक ग्रामपंचायतीला या कामासाठी 20 लाख रूपयाचा निधीही त्यांनी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे। एकटे सरकार हे काम पूर्ण करू शकणार नाही याची त्यांना जाणीव आहे। म्हणूनच त्यांनी हा प्रश्न सर्वसाधारण माणसापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असून या कामात त्यांचेही सहकार्य मागितले आहे। चला, आपणही या कार्यक्रमाला हातभर लावून हा प्रश्न धसाला लावू या।

 

साभार : जलसंवाद अंक 10 ऑक्टोबर 2014

 

लेखक मोबाइल : 09325203109

TAGS