सागरमित्र अभियान

Thursday, June 18, 2015 - 16:46

श्री. विनोद बोधनकर, सहसंघटक, सागरमित्र अभियान, अध्यक्ष, जलबिरादरी, पुणे जिल्हा

 

प्रशासकीय नियमांना नागरिकांच्या संयमाची जोड

 

अ. पर्यावरणाचे निमित्त, पंचमहाभूतांची ओळखः

 

अस्तित्वाच्या पूर्ण विस्तारामध्ये दृष्य आणि अदृष्य जग आहे। हे अस्तित्व पंचमहाभूतांच्या वेगवेगळ्या रचनांतून व्यक्त होत असते। पृथ्वी, जल, वायु, ऊर्जा, आकाश हे पंचमहाभूत आहेत। त्यांच्याच एकत्रित रचनेतून आपले शरीर बनले आहे। आपल्या मनाला सुदृढ शरीराची साथ असणे आवश्यक आहे। पृथ्वी, जल आणि वायु हे जड महाभूत आहेत व ऊर्जा अाणि आकाश हे सूक्ष्म महाभूत।

 

आपले शरीर पृथ्वी (Solids), जल (Liquids), आणि वायु (Gases) यांनी बनलेले आहे। आपण खाद्य खातो, द्रव सेवन करतो व श्वास घेतो हे आपल्या शरीरातील जगण्याच्या प्रक्रियेत खर्च झालेल्या पृथ्वी, जल आणि वायु यांचे पुनर्भरण करण्यासाठी, पुनर्भरीत महाभूतांवर आपल्या शरीर इंद्रीयांद्वारे प्रक्रिया होते व जीवन जगण्यासाठी ज्या हालचाली कराव्या लागतात त्यासाठी प्राणऊर्जा (Energy) उत्पन्न होते। सर्व प्रकारचे पदार्थ व शरीर हे आकाशाच्या पोकळीत हालचाल करीत असतात।

 

सभोवतालचे जड पदार्थ, द्रव पदार्थ आणि हवा प्रदूषित झाले तर खाद्य, पेय, रक्त, जीवन-द्रव्ये आणि श्वास प्रदूषित होतात। प्रदूषणामुळे शरीराचे आरोग्य बिघडते। म्हणून पृथ्वी, जल आणि वायु प्रदूषण टाळणे आवश्यक आहे।

 

ब. प्रदूषण समुद्रापर्यंत पोहोचले आहेः

 

जीवन प्रक्रियेनंतर उरलेल्या टाकाऊ वस्तुंच्या विल्हेवाटीच्या गैरव्यवस्थापनामुळे प्रदूषण होत असते। कमी प्रमाणात फेकलेल्या टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट निसर्ग लावू शकतो पण अति प्रमाणात फेकलेल्या टाकाऊ वस्तू निसर्गही पचवू शकत नाही। मानव निर्मित प्लास्टिक वस्तूंचे तर विघटनच होत नाही।

 

आधुनिक निर्मिती तत्वज्ञान, अनैसर्गिक पदार्थांची प्रचंड प्रमाणात निर्मिती, औद्योगिकरण, शहरीकरण, ग्राहकांची वाढती संख्या, दिशाभूल करण्याचा जाहिरातींचा सतत भडिमार, वाढत्या गरजा, वाढती स्पर्धा, वाढता स्वार्थ, या धकाधकीत मी असुरक्षित आहे ही भावना, मी एकटा आहे ही भावना, स्वयंकेद्रीत जीवन पध्दती, वाढत्या जीवन- गती मुळे वापरा- आणि फेका ही टाकाऊ वस्तूंना निष्काळजीपणे कुठेही भिरकावून फेकण्याची सवय- या सर्वांमुळे कचन्याचा एक राक्षस पसरलेला आहे आणि जमीन, जलाशय, जलप्रवाह व हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे मानवाचे आरोग्यच नव्हे तर पृथ्वीवरील पर्यावरण, जलावायुचक्र आणि निसर्गाचे संतुलनच बिघडले आहे।

 

प्लास्टिक कचन्यामुळे तर समुद्रांवरच संकट आले आहे। शेकडो लाख चौरस किलोमीटर समुद्रावर प्लास्टिकचा कचरा पसरला आहे। हजारो नद्यांमधून हा प्लास्टिकचा कचरा समुद्रत येवून साठतो। पृथ्वीवर प्लास्टिकची निर्मिती दर वर्षी 20 कोटी टन आहे व त्यातील 2 कोटी टन प्लास्टिक समुद्रात पोहोचते। दर चार वर्षांनी ही संख्या दुप्पट होणार आहे।

 

या प्लास्टिकमुळे असंख्य पक्षी, मासे, कासव, सील आणि इतर जलचरांना मृत्यु होतो। जीव हा प्लास्टिकमध्ये अडकतो व मरतो किंवा प्लास्टिकचे सेवन केल्यामुळे मरतो। उत्तर प्रशांत महासागरावर तर जागोजागी सहा महाराष्ट्रांच्या क्षेत्रफळा येवठया विस्ताराचे प्लास्टिक प्रदूषण झाले आहे ज्यांत 100 पैकी 9 माशांमध्ये प्लास्टिक सापडते।

 

क. प्रदूषण नियंत्रण आणि निर्मलनासाठी चौथे सूत्रः

 

अनेक दशकांच्या अभ्यासानंतर प्रदूषण नियंत्रणासाठी तीन सूत्री कार्यक्रम सुचविला जातो- Reduce, Reuse & Recycle. म्हणजेचः वस्तूंचा व संसाधनांचा कमी वापर करावा। परत परत वापर करावा व टाकाऊ वस्तूंचे पुनर्निर्माण करून त्यांस टिकाऊ बनवावे, व पुनः उपयोगात आणावे।

 

यासाठी कचरा फेकणे टाळून शासन प्रेरित सम्पूर्ण लोकसहभागातून कचन्याचे ओला- सुका व प्लास्टिक असे विकेंद्रीत व केंद्रीत जमा करण्याची व्यवस्था घडविणे व राबविणे हा उपाय करावा लागेल। जर कचन्याचे वर्गीकरण झाले नाही व वेगळा जमा करण्याची व्यवस्था झाली नाही तर कचन्यावर प्रक्रिया करणान्या  पुनःउपयोग व पुनःनिर्मिती उद्योगांना कधीच यश मिळणार नाही। Reduce, Reuse & Recycle चे नवे रूप Reduce, Recollect, Reuse & Recycle असे करावे लागेल। वर्गीकृत पुनःसाठवण हे प्रदूषण नियंत्रण व निर्मूलनासाठी लागणारे चौथे सूत्र आहे व यालाच ‘ Seperation at source and decentralised and centralised Recollection’ असे म्हणतात।

 

ड. लोकसहभागाचे महत्वः (नियमाला संयमाची जोड):

 

प्रदूषणाविरूध्दचा हा लढा यशस्वी होईल का? यासाठी एक महत्वाचे सूत्र असे आहे की जोपर्यंत सम्पूर्ण लोकसहभाग होत नाही तोपर्यंत कचरा फेकणारे व प्रदूषण करणारे हात जास्ती व त्यावर नियंत्रण आणणारे हात कमी। शहरातील रहदारीतून स्कूटर चालवितांना जेव्हा चौकात लाल दिवा लागतो तेव्हा आपण आपला ब्रेक दाबत असतो। शेजारील स्कूटरचा ब्रेक दाबणे कदापी शक्य नाही। तसेच समुद्रापर्यंत प्रदूषण पोहोचले आहे हे कळल्यावर आपण आपल्या कचरा फेकणान्या हातावर व वृत्तीवर संयमातून नियंत्रण आणणे आवश्यक आहे। प्रत्येक स्कूटरचा ब्रेक जसा त्याच्याय चालकाने दाबायचा आहे तसेच प्रत्येक फेकणान्या हाताला ब्रेक त्या व्यक्तीलाच लावायचा आहे।

 

अर्थात, प्रदूषण टाळायचे असेल तर केवळ शासनाने नियम बनविले तर होणार, असे नाही। अगदी प्रत्येकाला कचरा फेकणे टाळून तो कचरा वर्गीकृत करून योग्य जागेवर प्रक्रियेसाठी पाठविणे- हाच एक कायमस्वरूपी उपाय आहे। याला RECOLLECTION असे म्हणतात।

 

जमा केलेला वर्गीकृत कचरा जेव्हा योग्य जागेवर प्रक्रियेसाठी पोहचतो तेव्हा-

-ओल्या कचन्यापासून गॅस निर्मिती होते व इंधनाच्या कांडया बनतात।

-कोरडया कचन्याची पुननिर्मिती होते।

-प्लास्टिकची पुननिर्मिती होते।

 

प्रत्येक घरी कचन्याच्या तीन कुंडया ठेवणे आवश्यक आहे- ओला, सुका व प्लास्टिक कचरा। 1 किलो कचरा 30 किलो ओल्या कचन्यात मिसळते व हा मिक्सड कचरा कोणत्याही कमाचा नाही। अशा प्रकारे सर्व टाकाऊ वस्तूंचे आयोजनबाह्य व अस्ताव्यस्त फेकणे प्रत्येकाने थांबविले तरच प्रदूषण मुक्तीचे ध्येय साकार होवू शकेल।

 

या दिशेने समाजाची वाटचाल घडविण्यासाठी, शासनाच्या प्रयत्नांना जोड देण्यासाठी सागरमित्र अभियान पुण्यातील 75 शाळेत चालू आहे व यातील 75,000 विद्यार्थी व यांच्या घरातील प्रत्येकी 4 व्यक्ति असे मोजले तर एकूण 3 लाख नागरिक घरातील स्वच्छ, कोरडे व रिकामे प्लास्टिक एक महिनाभर एका प्लास्टिकच्या पिशवीत जमा करतात व महिन्यातून एकदा शाळेत जमा करतात। प्लास्टिकचे निर्माते हे प्लास्टिक विकत घेतात व शाळेला योग्य मानधन देवून गोडाऊन मध्ये जमा करतात। मागच्या दोन वर्षात असे 13.5 टन प्लास्टिक जमा झाले व त्याचे पुनर्चक्रीकरण झाले- was RECOLLECTED and RECYCLED.

 

खरे तर मुळात आपण प्लास्टिकचा उपयोगच कमी करावा। पण लाल दिव्यास पाहून थांबणे टाळणारे वाहनचालक खूप आहेत तसेच प्लास्टिक फेकणारे हात करोडो आहेत। त्यांना सध्यातरी लाखोंच्या संख्येने संयमीत करणारे सागरमित्र अभियान व शासनाचे प्रयत्न यातून हे संघटीत संयम व शिस्त याचे कार्य नक्कीच करोडोंच्या संख्येनेही करता येईल। यात कमिन्स इंडिया समूह, ए.आर.ए.आय, टाटा मोटर्स, लायन्स इंटरनॅशनल व रोटरी इंटरनॅशनल, ट्रायडेंट सर्व्हिसेस, सुझलॉन, पारमिसॉफ्ट यांसारख्या उद्योगकांचा सी.एस.आर (Corporate Social Responsibility) चा सहभाग आपल्यामुळे शासन-उद्योग-स्वयंसेवी संस्था-शाळा-नागरिक यांच्या सर्वांग- सहयोगातून संयम नावाचे संस्कार कृती शिक्षणातून सर्वदूर रूजवीता येईल।

 

जलबिरादरी, गायत्री परिवार, वसुंधरा स्वच्छता अभियान यांसारखे NGO व अनेक शिक्षण संस्था यांचाही आशीर्वाद लाभल्यामुळे संयम रूजविण्याचे कार्य गतीशील होत आहे।

 

इ. सागरमित्रे कार्य क्षेत्रः

 

सागरमित्रचे अभियानचे कार्य आता नागपूर, कल्याण, डोंबिवली, जळगाव, सोलापूर व वाई शहर येथे तेथील कार्य गट बांधून मोजक्या शाळांमध्ये सुरू झाले आहे व जुत्रर व मुळशी तालुक्यात प्रायोगिक तत्वांवर कार्यकर्ते जोडणे सुरू आहे।

 

पुण्यात, सागरमित्र दुकानदार, व सागरमित्र गृहरचना संस्था हे या वर्षीचे प्रयोग क्लीन गार्बेज मॅनेजमेंट या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत। हे प्रभाग 54 वडगाव धायरी येथील प्रत्येक शाळेत, निवडलेल्या दुकानदार व गृहरचना संस्थांमध्ये पूर्णत्वास नेतील।

 

इतर प्रभागातील विद्यार्थी, शाळा, दुकानदार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था व गृहरचना संस्थांचे पदाधिकारी व रहिवासी नागरिकांचे सहकार्य असावे ही आम्ही आपणास केलेली प्रार्थना आहे।

 

सागरमित्र अभियानातर्फे शासनाच्या आधाराने सर्व विद्यार्थी व पालकांच्या जीवनशैलीत ‘वापरा आणि फेका’ च्या ऐवजी ‘वर्गीकृत जमा करा व योग्य जागी पुनःवापर व पुनःनिर्मितीसाठी हा कचरा पाठवा’ हा संस्कार रूजविण्याचे कार्य या वर्षी बंगळुर, जालना, अमरावती, भोपाळ, बरोडा, सुरत, बुलढाणा, बीड, नांदेड, औरंगाबाद व अन्य 20 शहरांत बोलावले आहे। काही वर्षांतच 150 मुलांनी सुरू केलेले हे सागरमित्र अभियान 150 शहरांत सुरू करण्याचा मानस आणि धाडस आहे। कोणत्याही शहरात बोलविल्यास तेथे येवून मार्गदर्शन करण्यास सागरमित्र परिवार कटीबध्द आहे।

 

फ. महत्वाच्या दोन सूचनाः

 

1. जोपर्यंत शाळेत जमलेल्या प्लास्टिक साठा विकत घेवून जाणारा प्लास्टिक डीलर अथवा कारखानदार नेमका ओळाखून त्यास सम्पूर्णतः या कार्य कटीबध्दतेत आणता येत नाही तोपर्यंत सागरमित्र कार्यक्रमाची सुरूवात करू नये व त्याचे शाळेमध्ये व्याख्यान देवू नये। नाहीतर मुले तत्परतेने प्लास्टिक जमा करतील पण पुढची- ते प्लास्टिक शाळेतून घेवून जाण्याची व पुनर्निमाण करण्याची- प्रक्रिया नाही झाली तर कार्यक्रम अर्धवट होईल। प्लास्टिक साठा विकत घेण्याची व कारखान्यापर्यंत पुननिर्मिती प्रक्रियेसाठी पोहचवण्याची व्यवस्था आधीच तयार ठेवणे हे शहरात सागरमित्र अभियान सुरू करणान्यांचे धर्मकर्तव्य आहे।

 

2. घरी प्लास्टिक जमा करतांना विद्यार्थी व पालकांनी काळजी घ्यावी की ती प्लास्टिकची पिशवी स्वयंपाक घराच्या बाहेरच ठेवली पाहिजे। त्या प्लास्टिकच्या पिशवीजवळ उदबत्ती, धूप, दिवा किंवा डास मारण्याची कॉईल असू नये। थोडक्यात प्लास्टिक हा पदार्थ लवकर पेट घेतो हे लक्षात ठेवूनच प्लास्टिक एकत्र ठेवण्याची पिशवी सुरक्षित ठेवावी।

 

3. नियमाला संयम जोडा/ शिस्तीने बेशिस्त मोडा/ प्रदूषणाचे मूळ तोडा/ तिसन्या स्वराज्यसाठी/ श्रमजागृतीची रेष ओढा/ टाकाऊ मधूनच टिकाऊ काढा/ पृथ्वी भोवतालचा प्रदूषण वेढा/ भेदण्यास निघाले सागरमित्र।

 

साभार :  जलसंवाद अंक 10 ऑक्टोबर 2014

TAGS