निसर्गत ‘कचरा’ हा शब्दच नाही

Monday, June 15, 2015 - 10:07

श्री संतोष गोंधळेकर, पुणे

 

स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने यावर्षीच्या 2 ऑक्टोबर पासून कचन्याने पुन्हा ‘Centre stage’ वर मध्यवर्ती भूमिका घेतली आहे। पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदींनी स्वतः हातात झाडू घेवून रस्ते साफ करायला सुरूवात केल्यावर दया विषयाचे महत्व खास अधोरेखित झाले आहा। येत्या वर्षात सन 2019 पर्यंत, म्हणजे महात्मा गाँधीजींच्या 150 व्या जन्मशताब्दीपर्यंत सम्पूर्ण देश जाणवेल इतका स्वच्छ करणे व स्वच्छ ठेवणे असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। काही मूलभूत वैयक्तिक व सामाजिक शिस्तीचा अभाव हेय याचे मुख्य कारण आहे।

 

आपले घर स्वच्छ करणे व घाण रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी नेवून बिनदिक्कत टाकणे ही एक सर्वसाधारण सामुहिक सवय झाली आहे। देशभरातील कोणच्याच नगरपालिका वा महानगरपालिकाही यामध्ये मागे नाहीत। देशाच्या राजधानी दिल्ली येथील कचन्याचेही काय करयाचे यालाही अजून काहीही उत्तर सापडले नाही। पुणे, मुम्बई, नागपूर ते बंगलोर सर्वच महानगरांमध्ये रोज निर्माण होणारा हजारो टन कचरा निव्वळ ‘Dump’ केला जात असून कचन्याचे अभौगोलिक डोंगर आणि पर्वतरांगा सर्वत्र दिसत आहेत।

 

कचरा निर्मूलनाचे विविध उपाय आजपर्यंत योजले राबविले गेले आहेत मजबूत खर्चही यासाठी केला जातो। एकट्या मुम्बई शहराचे बजेट 1000 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे, आणि यात शहरातीत कचरा गोळा करून वाहतूक करून देवनारला ढीग लावणे एवढीच गोष्ट येते। कचन्याची अजिबात विल्हेवाट लावली जात नाही, दुर्दैवाने ज्यांच्या अंगणा शेजारी हा कचरा येतो त्यांचे हात कुत्रा ही खात नाही।

 

आजच्या संगणक क्रांतिच्या युगात आणि ज्या देशान मंगळवार यान पाठविले त्या तंत्रविशारद समाजाला साधे कचन्याचे कोडे सुटू नये हे लांछनास्पद आहे।

 

आमच्या गंगोत्री गटाने गेली 3 वर्षे या प्रश्नाचा सर्वकष अभ्यास केला आम्ही तरी या निष्कर्षाप्रत आलो की, कचन्याचा प्रश्न जरी असला तरी त्याचे उत्तर हे खूप साधे-सोपे-सरळ आहे। सुका कचरा आणि ओला कचरा असे वर्गिकरण घरगुती पालळीवर केले आणि तो कचरा प्रभाग पातळीवर एकत्र केला तर या वेगळ्या केलेल्या कचन्याच्या प्रत्येक घटकावर थोडी प्रक्रिया करून त्याचे विक्रीयोग्य ‘उत्पादन’ तयार करता येते। कचरा ही घाण नसून, कचरा ही ‘सम्पत्ति’ आहे। खरंतर निसर्गात कचरा नावाची कोणतीय गोष्ट नाही, आपण सर्वानी कचन्याकडे कचन्याचे वर्गीकरण व पुनर्वापरः

 

ओला कचरा आणि सुका कचरा असे सर्वसाधारण दोन वर्ग आपण समजावून घेवू, ओला कचरा म्हणजे निसर्गनिर्मित वनस्पतीजन्य सर्व काही, म्हणजे यामध्ये भाजीपाल्यांचे अवशेष, फळांचे अवशेष, पालापाचोळा, नासलेले पदार्थ, टाकावू अत्र, सुकलेली फुले, नारळ, शहाळी, अंडयांची टरफले, केसांचे गुंतवळ, हाड-मास, मासे इत्यादी सर्व पदार्थ येतात।

 

सुका कचरा म्हणजे रद्दी कागद, दूध पिशवी, प्लास्टिक बाटल्या, कागद, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बेंग्स, खिळे, नटबोल्ट, रबर टायर, थर्मकोल, पुठयाची खोती, टेट्रापॅक, अॅल्युमिनियम कॅन्स, गोळ्या- औषधांची वेष्टने, प्लास्टिक कॅन्स ते गुटक्याची पाकीटे असे सर्व काही येते। या सर्व मानवनिर्मित वस्तू आहेत।

 

सुक्या कचन्याकडे नीट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की यातील प्रत्येक घटक जर वेगवेगळा केला तर त्याचा पुनर्वापर करता येवू शकतो। सर्व प्रकारचे धातू वितळवून पुन्हा नवी वस्तू करचा येते। काचेचीही पुन्हा वस्तू करता येते। सर्व प्रकारचे प्लास्टिकचे Pyrolysis तंत्रज्ञानाने द्रवरूप इंधन करता येते। यामध्येच टायर्स व धर्माकोलही म्हणजेच 100 टक्के कोरडचा सुक्या कचन्याची सहज विल्हेवाट लावला येते।

 

ओल्या कचन्याचे करायचे काय हा खरा कचरा व्यवस्थापनातला कळीचा प्रश्न आहे। ओल्या कचन्याच्या विल्हेवाटीसाठी आज दोन तंत्रे वापरली जातात। पहिले आहे-ओल्या कचन्याचे सेंद्रीय खत-कंपोस्ट करणे आणि दुसरे आहे त्याचा बायोगॅस करणे।

 

सेंद्रीय खत करताना ओल्या कचन्यामध्ये काही जिवाणू सोडले जातात ज्यामुळे ओल्या कचन्याचे विघटन वेगाने होईल। तरीही ही प्रक्रिया 10 ते 15 दिवस चालते। इतके दिवस ही प्रक्रिया चालू ठेवायला जागाही खूप लागते। प्रक्रिया उघड्यावर करत असल्यास पावसाळ्यामध्ये ती करता येत नाही। नारळ शहाळी सारख्या पादर्थांचे नीट विघटन होत नाही।

 

ऑक्सिजन विरहित वातावरणाक जिवाणूंच्या प्रक्रियेद्वारे ओल्या कचन्याचे विघटन बायोगॅसमध्ये करण्यात येते। ही प्रक्रियासुध्दा 30 ते 40 दिवस चालते। ओल्या कचन्यातील केवळ काही घटकांचेच विघटन होवून त्याचा बायोगॅस होतो। उर्वरित 50 टक्के हून जास्त ओला कचरा हा शिल्लक राहातोच। लिंब वर्गीय फळे, अंडयाची टरफले, नारळ-शहाणी, झाडाच्या फांद्या वा मांसाहारी पदार्थांचे बायोगॅसमध्ये होत नाही, व त्यामुळे हा सर्व कचरा तसाच राहतो।

 

सेंद्रीय खत व बायोगॅस या दोन्ही तंत्रज्ञानाच्या मर्यादांचा गंगोत्री गटाने अभ्यास केला आणि ओल्या कचन्याच्या सर्वकष विल्हेवाटीसाठी एक सम्पूर्ण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित केले। या तंत्राचे प्रत्यक्ष प्रयोग सध्या पुणे शहरामध्ये चालू आहेत। आणि हे प्रयोग यशस्वी झाले आहेत। या तंत्रात ओल्या कचन्याचे रूपांतरण इंधन कांडीमध्ये (Fuel Pellets) केले जाते। ही प्रक्रिया एका दिवसात पूर्ण होते।

 

सर्व प्रकारचा कचरा प्रक्रिया केन्द्रावर स्विकारला गेल्यावर दोन तासात त्याचे प्रथम बारीक तुकडे केले जातात। एका तासात तो कचरा पिळून त्यातील सुमारे निम्मे पाणी काढून टाकले जाते। राहिलेला घन कचरा गरम हवेच्या साहाय्याने वाळवून त्याची कोरडी पावडर केली जाते। व या वाळलेल्या पावडरच्या ईंधन कांडया केल्या जातात। विशिष्ट प्रकारच्या बिनधूराच्या चुलीमध्ये या कांडया वापरल्या जातात व हॉटेल्समध्ये चक्क यावर जेवण तयार केले जाते। ओला कचरा पिळून काढलेल्या पाण्याचा बायोगॅस केला जातो व बायोगॅस प्लांटमधून बाहेर पडलेले पाणी उत्तम प्रकारचे द्रवरूप फर्टिलायझर म्हणून वापरता येते। प्रक्रिया केन्द्रावर आलेल्या ओल्या कचन्याचे इंधन कांडी, बायोगॅस आणि द्रवरूप खत अशा तीन विक्रीयोग्य उत्पादनात रूपांतरण केले जाते।

 

घरगुती पातळीवर ओला व सुका कचरा वेगळा केला तर प्रत्येक प्रकारच्या कचन्यावर प्रक्रिया करचा येवू शकते आणि कचरारूपी महाराक्षसाला लीलया वध करता येवू शकतो। राजकीय पुढाकार, सामाजिक भान आणि तंत्रज्ञानाच्या साथीने स्वच्छ भारत अभियान सम्पूर्णपणे यशस्वी होवू शकेल।

 

साभार : जलसंवाद अंक 10 ऑक्टोबर 2014

 

लेखक मोबाइल : 09822038222

TAGS