घन कचरा व्यवस्थापन तज्ज्ञ

Sunday, June 14, 2015 - 10:34

श्री. रवी पटवर्धन यांची मुलाखत

 

कचरा व्यवस्थापन विशेषांक काढायचे निश्चित झाल्यावर पुण्यात घन कचरा व्यवस्थापनात कोणकोण कार्य करतात याचा जेव्हा शोध घ्यावसाय सुरूवाल केली तेव्हा सहजच जे नाव पुढे आले ते श्री. रवी पटवर्धन. घन कचरा व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यात त्यांनी गेली 20-25 वर्षे खर्ची घातली आहेत, त्यांना जेव्हा घन कचरा व्यवस्थापनावर लेख लिहिण्याची विनंती केली त्यावेळी लेख फारच साचेबध्द होईल, त्यापेक्षा आपण या विषयावर चर्चा करू व त्या चर्चेतून जे मुद्दे बाहेर येतील ते तुम्ही मुलाखतीव्या स्वरूपात मांडा अशी त्यांनी सूचना केली. ज्या दिवशी आमचे बोलणे झाले त्याच्या दुसन्या दिवशीच मी व श्रीमती निर्मलाताई कांदळगावकर त्यांच्या घरी जावून धडकलो, त्यांनी आमचे स्वागत केले, त्यांच्या पत्नीची ओळख करून दिली व त्यांनी ऑफर केलेल्या चहाच्या कपावर मुलाखतीला सुरूवात झाली, पहिलीच भेट असून सुध्दा लवकरच उपचार गळून पडले व मित्रत्वाच्या नात्याने बोलणे सुरू झाले।

 

आपण मेकॅनिकल इंजिनियर असून सुध्दा या विषयाकडे कसे वळलात?

 

मुम्बईला जो गोगटे उद्योग समूह आहे त्या समूहात मी सुरूवालिता काम केले. त्यानंतर मी बाँधकाम व्यवसायाकडे वळलो। 16 वर्षे बाँधकाम व्यवसायात छोटीमोठी कामे केलीत। 2000 साली मात्र हा व्यवसाय मी पूर्णपणे बन्द केला, या व्यवसायातूनच कचरा व्यवस्थापनात शिरलो। तसा 1998 पासूनाच या कामाशी माझा सम्बन्ध आला। सुरूवातीला या कामात प्रबोधन करावयास सुरूवात केली। मग मात्र मागे वळून पाहाण्याची इच्छाही झाली नाही।

 

या क्षेत्रातले समविचारी कार्यकर्ते मिळण्यात काही अडचण गेली का?

 

पुण्यातील बन्याच लोकांनी हे कार्य आधीच सुरू केले होते। त्यांचा परिचय होत गेला व कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार झाली।

 

अशा प्रकारचे काम करतांना सहसा घरून विरोध होत असतो, तशा प्रकारचा विरोध आपल्या कुटुंबियांकडून झाला का?

 

माझी पत्नी स्वतः सामाजिक कार्यात गुंतली आहे। तिला या विषयाचे महत्व आधीच पटले असल्यामुळे घरून विरोध होण्याचा प्रश्नच नव्हता। उलट या कामात तिच्याकडून प्रोत्साहनच मिळाळे।

 

कचरा व्यवस्थापनात कोणते प्रश्न महत्वाचे वाटलात?

 

कचरा व्यवस्थापनात तीन प्रश्न प्रामुख्याने विचारात घ्यावे लागतात। पहिला प्रश्न म्हणजे कचरा जमविणे। प्रत्येक घर हे कचरा निर्माण करणारे एक केन्द्र आहे। अशा विखुरलेल्या ठिकाणाहून कचरा जमा करणे हे एक मोठे आव्हानच असते। शिवाय आपाला समाज या बाबतीत निष्क्रिय असल्यामुळे कचन्याचे विलगीकरण त्याच्या कडून केले जात नाही। एवढेच नव्हे तर ओला कचरा कशाला म्हणावे याबद्दलही तो अज्ञानी आहे। कचरा जमा झाल्यानंतर त्यावर प्रक्रिया करावी लागते व त्यानंतर त्याचा विनियोग पण महत्वाचा आहे। अशी कचरा व्यवस्थापनाची जमवाजमव, प्रक्रिया व विनियोग अशी त्रिसूत्री आहे।

 

कचरा व्यवस्थापनाकडे व्यवसाय म्हणून बघितले जावू शकते का?

 

निश्चितिच। भारतासारख्या बेरोजगारी असलेल्या देशात तर कचरा व्यवस्थापनातील उद्योजकता फार मोठे योगदान देवू शकते। कचरा व्यवस्थापनाचे एक युनिट कमीतकमी 10 जणांना रोजगार पुरवू शकते। वर दाखविलेली तीन कामे वेगवेगळ्या व्यक्ती वा संस्था यांनी केल्या तर त्यात यश मिळणे कठीण असते। ही तीनही कामे एकाच व्यक्ती किंवा संस्थेच्या हालात असणे गरजेचे आहे।

 

लाल किल्ल्यावरून केलेल्या 15 ऑगस्टच्या पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी केलेल्या भाषणात कचरा व्यवस्थापनाबद्दल केलेला उल्लेख विरोधी पक्ष नेत्यांनी टीकेचा विषय बनविला। त्यामुळे या भाषणाचे गांभीर्य मोदींनी घालविले अशी खरमरित टीका त्यांनी केली। याबद्दल आपले काय मत आहे?

 

टीका करणारे बहुतांश नेते हे हस्तीदंती मनोन्यात वास करणारे आहेत। वास्तव जीवनाशी त्यांची नाळ गुंतलेली नाही। म्हणून ते अशा प्रकारची टीका करतात। खुद्द महात्मा गाँधींच्या आयुष्यातही त्यांनी अशा प्रकारच्या टीकेला सामोरे जावे लागले होते। मोदींनी आपल्या भाषणातच या टीकेला अप्रत्यक्षपणे उत्तर दिलेले आहे। सामान्य माणसासाठी स्वप्न पाहणारा मी माणूस आहे असे त्यांनी बोलून दाखविले। आज देशासमोर जे महत्वाचे प्रश्न आहेत त्यात नागरी स्वच्छता आणि सामाजिक आरोग्य हे कळीचे प्रश्न आहेत। त्यामुळे या प्रश्नांचा आपल्या भाषणात त्यानी उल्लेख केला यात काहीही वावगे केले असे मला वाटत नाही। त्यांचे खरे दुःख वेगळेच होते। त्यांच्या गाँधींना मोदींनी जवळ केले त्यांना जास्त वाईट वाटलेले दिसले।

 

कचरा व्यवस्थापनाबद्दल जनजागरण उभारणे आवश्यक आहे असे तुम्हाला वाटत नाही काय? हे जन जागरण करण्याबद्दल तुम्ही काही प्रयत्न केले आहेत काय?

 

नुसते कचरा व्यवस्थापनावर भाषणे देत राहणे, जनजागरण करीत राहणे पुरेसे नाही असे माझे मत आहे। त्याला कृतीची जोड देणे आवश्यक आहे। सामान्य माणूस, प्रशासन व राजकारणी या समाजातील तीन घटकांनी एकत्र येवून जोपर्यंत हे काम केले जात नाही तोपर्यंत ते अधुरेच राहील। मोदी याच प्रयत्नात असल्याचे दिसून येत आहे। एका बाजूनी त्यांनी जनतेला कामला लावले आहे। प्रत्येक आमदाराला वा खासदाराला एक गाव दत्तक घ्यायले लावले आहे व प्रशासनाला कृति करायला धारेवर धरले आहे। असे झाले तरच हे आन्दोलन यशस्वी होईल असे वाटते।

 

देशातील जलसाठयांवर या कचन्याचा विपरित परिणाम किलपत होत असतो?

 

पाण्याची शुध्दता व कचन्याचा फारच जवळचा सम्बन्ध असतो। त्यातल्या त्यात भूजलाचा सम्बन्ध तर जास्त आढळतो, या कचन्यावर जेव्हा पावसाचे पाणी पडते तेव्हा ते प्रदूषित होवून जमिनीच्या पोटात शिरते। ते पाणी जेव्हा भूजलात मिसळते तेव्हा भूजलाची गुणवत्ताही धोक्यात येते। भूजलसाठे जेव्हा प्रदूषित होतात तेव्हा ते शुद्ध करणे पूर्णपणे अशक्य राहते। पुणे शहरात कित्येक जुन्या विहीरी बुजवण्यात आल्या आहेत। त्यावर जेव्हा हे पावसाचे पाणी पडते त्यावेळी त्याचा भूजलावर फारच विपरित परिणाम होतो।

 

कचरा व्यवस्थापन हे फारच अवाढव्य असे काम आहे, त्या कामात युवाशक्ति, महिला, ज्येष्ठ नागरिकांना कितपत समाविष्ट करून घेता येईल?

 

कचरा व्यवस्थापन हा जगत्राथाचा रथ आहे। यात जितक्या लोकांचा सहभाग वाढेल तितके चांगलेच आहे। युवा शक्तिला यात रोजगाराच्या संधी आहेत। लाखो युवकांना यात रोजगाराच्या संधी आहेत। कचरा जमा करणे, त्यावर प्रक्रिया करणे व तयार झालेल्या मालाची विक्री करणे या तीनही क्षेत्रात भरपूर रोजगाराच्या संधी दडून बसल्या आहेत। त्या किती प्रमाणात ते बळकावू शकतात यावर त्यांचे कौशल्य अवलंबून आहे। महिलांचा या क्षेत्राशी दोहोबाजूंनी सम्बन्ध येतो। कचन्याची वासलात लावणे जितके महत्वाचे तितकेच तो निर्माण होवू नये यासाठीही प्रयत्न गरजेचे असतात, दोनही क्षेत्रात महिलांचा महत्वाचा हिस्सा राहू शकतो। ज्येष्ठ नागरिकांचा प्रबोधनात महत्वाचा वाटा राहू शकतो। आजही ज्येष्ठांकडे आदराने पाहिले जाते। त्याचा फायदा घेबून त्यांना या कामाशी जोडले जाबू शकते।

 

कचरा व्यवस्थापनात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार गुंतला आहे असे म्हणतात। या बदल आपले काय मत आहे?

 

कचन्याल आपण नगण्य समजतो। पण या व्यवहारात फार मोठया रकमेची उलाढाल होत असते। नगरपालिकांची यंत्रणा या क्षेत्रात भ्रष्टाचाराने लडबडंली आहे। उगीचच नाही नगरसेवक बनण्यात लोकांना रस असतो। कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नाही या पाठीमागे प्रामुख्याने हे कारण आहे। कचरा व्यवस्थापनात काम करणान्या संस्थांना या भ्रष्टाचाराल तोंड ध्यावे लागते व बरेचदा तर त्यांचे या भ्रष्टाचारामुळे कंबरडेच मोडले।

 

सरकार कडून हे काम अधिक नेटाने व्हावे यासाठी काय मदतीची आपण अपेक्षा करता?

 

हा प्रश्न सार्वजनिक आरोग्याशी निगडित आहे। सार्वजनिक आरोग्य चांगले राहिले तर त्याचे फार दूरगामी परिणाम होतात। लोकांची प्रकृति उत्तम रहाते। त्याचा कामावर अनुकूल परिणाम होतो। औषधांवरचा खर्च कमी होतो ती गोष्ट वेगळीच। सरकारने प्रत्यक्षपणे या कामात उतरण्यापेक्षा हे काम खाजगी क्षेत्राला करू देणे जास्त उचित ठरेल कारण त्यामुळे अधिक रोजगार निर्माण व्हायला चालना मिळेल। इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मात्र या कामात मदत करावी। यामुळे हा एक व्यवसाय म्हणून स्थैर्य पावेल। सामाजिक स्वास्थ्य सुधारल्येमुळे सरकारचा वैद्यकीय स्वरूपाचा खर्च आटोक्यात येईल।

 

आपण कचन्याचे विलगीकरण करणारी यंत्रसामुग्री तयार केली आहे असे आपल्या बोलण्यात आले। तिचा वापर कुठे होत आहे?

 

मी तयार केलेली यंत्रसामुग्री महाराष्ट्रात सहा ठिकाणी व गोवा राज्यात तीन ठिकाणी बसविण्यात आली आहे। ती बसवून दिल्यावर तिची चाचणी घेण्यात आली। सर्व ठिकाणी ती यशस्वी झाली। पण मला एकाच गोष्टीचे वाईट वाटते की चचणी यशस्वी होवून सुध्दा प्रत्यक्षात तिचा वापर केला जात नाही। छत्तीसगढ राज्यात मला 129 परिषदांत, 38 नगरपालिकांत व 9 नगर निगम या ठीकाणी यंत्रसामुग्री बसविण्याची ऑर्डर मिळाली आहे। प्रत्यक्षात ते काम अजून सुरू झाले नाही

 

श्री पटवर्धन यांनी चर्चेसाठी भरपूर वेळ दिला। यातून बन्याच नवीन गोष्टी समजल्या, त्यांनी हाती घेतलेले काम फारच मोठे आहे। त्या कामात त्यांना यश तिंचून व मुलाखत दिल्याबदल धन्यवाद देबून त्यांची रजा घेतली।

 

साभार : जलसंवाद अंक 20, अक्टूबर 2014

 

लेखक मोबाईल: 09423012256

TAGS